रहस्य: द सीक्रेट बुक मराठी | The Secret Book in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत The Secret Book in Marathi pdf शेअर करणार आहे. जे Rhonda Byrne ने लिहिले आहे. पुस्तकात अशी काही रहस्ये सांगितली आहेत की तुम्हाला आनंद मिळेल, प्रसिद्धी मिळेल म्हणजेच तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतील. हे जगातील सर्वात मौल्यवान रहस्य आहे का? जो याचे पालन करतो त्याचे जीवन बदलू शकते.

BookThe Secret
AuthorRhonda Byrne
Total Pages175
LanguageMarathi
Size7 MB

द सीक्रेट बुक मराठी में

“आपल्यातील नैसर्गिक प्रेरणाच आपले आजार बरे करते.”

हिप्पोक्रेट्स (इसपू 460-370) पाश्चिमात्य वैधकीचा जनक

आरोग्यदायी असणे म्हणजे नेमके काय? आजारी नसणे म्हणजेच आरोग्यदायी असणे असे तुम्हाला वाटत असेल. पण आरोग्यदायी असणे म्हणजे यापेक्षा खूप काही जास्त असते. तुम्हाला जर ठीक वाटत असेल, किंवा फारसे असे काहीच वाटत नसेल, तर तुम्ही आरोग्यदायी नसता.

आरोग्यदायी असणे म्हणजे लहान मुले जशी असतात तसे वाटणे. लहान मुले नेहमीच ऊर्जेने भरभरून वाहात असतात. त्यांच्या शरीरातून उत्साह सळसळत असतो आणि ते खूप लवचीक असतात. त्यांच्या हालचालींसाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सहजगत्या ते इथून तिथे पळत असतात. त्यांची मने स्वच्छ असतात. त्यांना खूप छान व शांत झोप लागते. पूर्णपणे प्रसन्न मनाने ते सकाळी उठतात. प्रत्येक दिवशी त्यांना नवा उत्साह असतो. लहान मुलांकडे बघा आणि मग तुम्हाला कळेल आरोग्यदायी असणे म्हणजे काय ते. अशाच पद्धतीने तुमचेही मन हवे. असेच प्रसन्न तुम्हालाही वाटले पाहिजे.

तुम्हाला असे वाटू शकते कारण, प्रेमाच्या आवेगाद्वारे खूप चांगले आरोग्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. कोणत्याही क्षणी काहीही तुमच्यापासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. तुम्हाला जे हवे आहे, ते तुमचे असू शकते आणि ते म्हणजे खूप चांगले आरोग्य. पण त्यासाठी तुम्हाला दरवाजे खुले करावे लागतील!

See also  રિચ ડેડ પુઅર ડેડ | Rich Dad Poor Dad Gujarati PDF

तुम्ही कशावर विश्वास ठेवता?

“तो जसा विचार हृदयात करतो, तसाच तो असतो.”

सोलोमन राजा (इसपू 10 वे शतक) इस्रायलचा बायबलममध्ये वर्णित राजा, प्रोव्हर्ब 23.7

शहाणपणाबद्दलचे हे खूप सुंदर शब्द आहेत. पण याचा अर्थ काय तो जसा विचार हृदयात करतो, तसाच तो असतो?

तुम्ही तुमच्या मनापासून जसा विचार करता तेच खरे होणार असा तुमचा विश्वास असतो. विश्वास म्हणजे केवळ अशा प्रकारचे विचार, ज्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत तीव्र भावना असतात. जसे, ‘मला पटकन सर्दी होते’, ‘माझे पोट पटकन खराब होते’, ‘मला वजन कमी करणे खूप कठीण जाते’, ‘मला अमुक एका गोष्टीची अंलर्जी आहे’, ‘कॉफीमुळे मला ताजेतवाने वाटते’. हे सारे तुम्ही मानत असता. ते काही खरे नसते. तुम्ही एखाधा गोष्टीबद्दल जेव्हा तुमचे मन तयार करता तेव्हाच तुमचा त्यावर विश्वास बसतो. त्यामुळे आरोपी आत असतो, तुम्ही दरवाजा बंद केलेला असतो आणि चावी फेकून दिलेली असते. त्यामुळे चर्चेसाठी मार्गच खुला नसतो. पण जे काही खरे आहे असे तुम्ही मानता, तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. तुम्ही जो काही विश्वास ठेवता, तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम, तुम्हाला तेच परत आणून देतो.

दरवाजा बंद केलेला असतो आणि चावी फेकून दिलेली असते. त्यामुळे चर्चेसाठी मार्गच खुला नसतो. पण जे काही खरे आहे असे तुम्ही मानता, तेच तुमच्यासाठी खरे बनून अस्तित्वात येते. तुम्ही जो काही विश्वास ठेवता, तेच तुम्हाला मदत करते किंवा तुम्हाला त्रास देते. जो काही विश्वास तुम्ही व्यक्त कराल, प्रेमाचा नियम, तुम्हाला तेच परत आणून देतो.

अनेक लोकांना चांगल्या आरोग्याबद्दल चांगल्या भावना असण्यापेक्षा आजारांबद्दलची भीती मनात असते. जगात कोणत्याही आजाराला जे महत्त्व दिले जाते, ते यामागचे कारण असणे काही आश्चर्यकारक नाही. औषधांमध्ये एवढी प्रगती झाली तरी आजारांचे प्रमाण वाढतच आहे, याचे कारण म्हणजे लोकांच्या मनातील आजाराबद्दलची भीती.

See also  She Stood By Me Book PDF

तुमच्या मनात आरोग्याबद्दल चांगल्या भावना आहेत की आजाराबद्दल भीती? आयुष्यभर टिकणाज्या चांगल्या आरोग्यावर तुमचा विश्वास आहे की होणाज्या आजारांवर? वाढत्या वयासोबत आरोग्य खालावत जाऊन आपण आजारी पडणारच असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशाच प्रकारचा विश्वास व्यक्त करता. आणि मग आकर्षणाचा नियम तुम्हाला तसाच प्रतिसाद देतो. परिस्थिती आणि तुमचे आरोग्य व शरीराची अवस्था यांच्या स्वरूपात तो तुमच्याकडे येईल.

Download PDF Now

If the download link provided in the post (रहस्य: द सीक्रेट बुक मराठी | The Secret Book in Marathi) is not functioning or is in violation of the law or has any other issues, please contact us. If this post contains any copyrighted links or material, we will not provide its PDF or any other downloading source. you can DONATE US here. Thank you.

Leave a Comment

Join Telegram For Upsc Material & Test Series

X