Download युगंधर कादंबरी शिवाजी सावंत Yugandhar Novel Book PDF In Marathi
Are you fond of reading Marathi books? If yes then today I am going to share with you the very best novel Yugandhar Shivaji Sawant Marathi Novel Book PDF (युगंधर कादंबरी शिवाजी सावंत) . Interested person can get it through the link given below, it is a novel book written in Marathi language and is available for free on the internet.
Description
श्रीकृष्ण ! गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री -पुरुषांच्या व्यक्त -अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा -एक युगपुरुष ! श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यत :श्रीमद्भागवत , महाभारत , हरिवंश व काही पुराणांत या प्रत्येकात गेल्या हजारो वर्षांत सापेक्ष विचारांची , मनगढंत पुटंच पुटं चढली . त्याचं तांबूस -नीलवर्णी , सावळ, गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं , श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय . तेही अतक्र्य चमत्कारांचे स्त्रोतच स्त्रोत -नकळत्या भाबडेपणी टाकल्यामुळ झालेलं आहे.
आज तर श्रीकृष्ण क्रमश :वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय . आजच्या ‘भारतीय ‘म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उद्गार आहे ! जसा आभाळातील सूर्य कधी शिळा वा बासा होत नाही तसाच हा महाभारताचा कथाकणा असलेला तत्त्वज्ञ वीर, आज तर नाहीच शिळा होणार नाही जन्मत:च दुर्मिळ रंगसूत्र लाभलल्यामूळ त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे .
श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भांची मोडतोड न करता त्याचं ‘युगंधरी ‘रूप बघता येईल का ? त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवनसरोवराचं दर्शन घेता येईल का ? गीतेत त्यानं विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का ? कि हातच्या दिव्य , गतिमान सुदर्शनासारखे प्रत्यक्ष जगुनही दाखविले ? त्याच्या जीवनसरोवरातील हजारो वर्षे दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे .
‘मृत्युंजय ‘ च्या यश:शील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन , सावध संदर्भशोधन , डोळस पर्यटन व जाणत्यांशी संभाषण यातून साकारलेली साहित्यकृती – युगंधर !!!
Book Name | Yugandhar / युगंधर |
Author | Shivaji Sawant / |
Language | Marathi |
Pages | 702 |
Source | Online |